रत्नागिरी दि. १९ :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग खार जमिन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 20 मे 2021 रोजी सांयकाळी 06.00 वाजता श्रीवर्धन येथून रत्नागिरीकडे शासकीय वाहनाने प्रयाण. रात्री 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार 21 मे 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता रत्नागिरी तालुक्यातील तौक्ते वादळामुळे नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा. सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी येथून राजापूर, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता राजापूर येथे आगमन व राजापूर तालुक्यातील तौक्ते वादळामुळे नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा. दुपारी 01.30 वाजता शासकीय विश्रामगृह, राजापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 03.00 वाजता रत्नागिरी जिल्हयात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाची आढावा बैठक. (स्थळ : शासकीय विश्रामगृह, राजापूर, जि. रत्नागिरी). दुपारी 03.30 वाजता पत्रकार परिषद. (स्थळ : शासकीय विश्रामगृह,राजापूर, जि. रत्नागिरी). सांयकाळी 04.00 वाजता शासकीय विश्रामगृह, राजापूर येथून कुडाळ, जि. सिंधुदूर्ग कडे प्रयाण.