याआधी ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये नोंदणी केली नाही – त्यामुळे नाफेडमध्ये हरभरा पिकाची नोंदणी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना अडचण येत आहे –

ती म्हणजे ऑनलाईन पीकपेरा नोंदणीची – तसेच हा पीकपेरा ई-पीक पाहणीच्या माध्यमातून नोंदणी केली तरच निघणार आहे

त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना 15 मार्चपर्यंत ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे

ई-पीक पाहणीचा काय फायदा ?

ई-पीक पाहणी या अँपमुळे शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पिकाची नोंद ऑनलाईन करता येणार आहे – त्यामुळे याची नोंद थेट पिक पेऱ्यावर होणार आहे