विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या आठ दिवसापासून प्राणंतीक उपोषण करत आहेत.
रात्री भरपावसात या उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली,आठ दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती.
यावर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तुम्ही इथं माझ्या राजीनामासाठी बसले की न्यायासाठी हे बरोबर नाही तुमची इच्छा असेल तर उद्याच मंत्री पदाचा राजीनामा देतो त्यांची काही पर्वा नाही बच्चू कडू सर्वांचा बाप आहे असही कडू म्हणाले.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यां संदर्भात 16 तारखेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली असून यात या उपोषणावर तोडगा काढण्यात येईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.