संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबीराची विक्रमी नोंद

दापोली:- संतोष अबगुल प्रतिष्ठान दापोली- मंडनगड-खेड व रत्नागिरी जिल्हा विभाग वसई नालासोपारा व विरारच्या माध्यमातून तिसऱ्यांदा  नालासोपारा येथे रविवारी ८ ऑगस्ट २०२१ रोजी पुन्हा एकदा ६११ रक्तदात्यांनी रक्त देऊन  रक्तदान शिबीरची नोंद केली.

रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान, रक्तदान हेच जीवनदान मानले जात असताना आताच्या काळात प्रत्येक रुग्णालयात रक्तचा तुटवढा भासत आहे. विविध संस्था रक्तदान शिबिरचे उपक्रम राबवत असून देखील ही रक्तदानाची समस्या दिवसांन दिवस वाढत आहे. अशातच संतोष अबगुल प्रतिष्ठांचे प्रेरणास्थान श्री. संतोष अबगुल यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक व वैद्यकीय शिबीरे होत असतात. दिनांक ८ आँगस्ट रोजी येथे  कांचन विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज विजय नगर, नालासोपारा पूर्व येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला सदस्यांसह  नागरिकांनी देखील सहभाग दर्शविला. श्री संतोष  अगबुल व माजी नगरसेवक श्री. अविनाश जाधव या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कोरोना काळात रक्त उपलब्ध होत नाही म्हणून रुग्णाच्या नातरवाईकांची तारांबळ होते. हे पाहून व त्याची उणीव भासू नये म्हणून संस्थापक श्री संतोष अबगुल यांच्या माध्यमातून संतोष अबगुल प्रतिष्टान दापोली- मंडणगड-खेड व रत्नागिरी जिल्ह्या विभाग वसई नालासोपारा व विरारच्या माध्यमातून तिसऱ्यांदा भव्य रक्तदान शिबिरा करण्यात आले.
या प्रतिष्ठान च्या सहयोगात महात्मा गांधी सेवा मंदिर हॉस्पिटल ब्लड बँक नवी मुंबई, साथीया ब्लड बँक, नवी मुंबई, ब्लड लाईन ब्लड बँक आणि विजया ब्लड बँक यांनी सहयोग दिला. या शिबिरात प्रमुख्याने सात ते आठ तालुक्यातील रक्तदातांनी सहभाग घेतला. संतोष अगबुल प्रतिष्ठान हे केवळ प्रतिष्ठान नसून आपल्या परिवाराचा हिस्सा असल्याने कोणत्याही क्षणी कोणहीती मदत केली जाईल असे श्री. संतोष अगबुल यांनी मनोगत वेक्त केले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असता ६११ रक्त दाता लाभले. असा ईतिहास नालासोपारा परिसरात प्रथमच या प्रतिष्ठानने केल्याचे संबोधले जाते आहे. या कार्यक्रमात सर्व सभासदांनी शंभर टक्के प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी केला. विशेष म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व रक्त दाताला प्रतिष्ठानचे प्रेरणास्थान श्री. संतोष अगबुल यांच्यावतीने आभार मानले. प्रत्येकाला कोणत्याही क्षणी कोणहीती मदत लागल्यास मी सदैव आपल्या सेवे साठी हजर राहण्याची ग्वाही दिली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*