रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. चिंता वाढवणारी स्थिती रत्नागिरीत निर्माण झाली आहे. एक दिवसात १५५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं परिस्थिती नियंत्रण बाहेर तर जात नाहीये ना? ही चिंता अनेकांना सतावू लागली आहे.
रत्नागिरी, चिपळूण, गुहागर तालुक्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एकट्या रत्नागिरीत 56 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या खालोखाल चिपळूण 35 आणि गुहागर 27 अशी स्थिती आहे.
दापोली, खेड, संगमेश्वर तालुक्यामध्येही कोरोनाची रूग्ण वाढत आहेत. योग्य ती खबरदारी आणि नियमांचं काटेकोर पालन करून लोकांनी दैनंदिन कामं पार पाडणं आवश्यक आहे.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11262वर पोहोचली आहे. आज ५४ रुग्ण बरे झाल्यानं बरे झालेल्यांची एकूण संख्या 10204 झाली आहे.
आरटीपीसीआर
रत्नागिरी 32
दापोली 2
खेड 6
चिपळूण 32
गुहागर 23
संगमेश्वर 11
मंडणगड 1
लांजा 2
राजापूर 2
एकूण 111
अॅटीजेन
रत्नागिरी 24
चिपळूण 3
संगमेश्वर 7
गुहागर 4
दापोली 3
खेड 3
एकूण 44