दापोली : दापोली अर्बन बँकेचे कर्मचारी रविंद्र मुलुख यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. दापोली अर्बन बँकेत ते शिपाई या पदावर कर्यरत होतो. कामाच्या बाबतीत त्यांचा उत्साह वाखाण्याजोगा होता. त्याच्या अचानक जाण्यानं अर्बन बँकेची हानी झालीये एवढं निश्चित.

जयवंत जालगावकर आणि संचालक मंडळांनी व्यक्त केला दुःख

दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर यांनी रविंद्र मुलुख यांच्या अशा अचानक जाण्यबद्दल तीव्र शब्दात दुःख व्यक्त केलं. बँकेला पुढे नेताना प्रत्येक शिलेदार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. रविंद्र मुलुख अतिशय प्रमाणिकपणे आपलं काम करत होता. त्याच्या कामाची गती कमालीची होती. तो आता आपल्यात नाहीये यावर विश्वास बसत नाहीये. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया दिली. अर्बन बँकेच्या सर्व संचालकांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अर्बन बँकेचे संभाजी थोरात यांनी फेसबुक पोस्ट लिहित श्रद्धांजली वाहिली

दापोली अर्बन बँकेचे कर्मचारी रविंद्र मुलुख याचे काल ह्रदयविकाराने दु:खद निधन झाल्याची बातमी श्री. कडू साहेब यांनी फोनद्वारे सांगितली पण क्षणभर विश्वासच बसेना. परवा मी कराडला यायला निघालो तेंव्हा भेटलेला रवी आज आपल्यात नाही ही जाणीवही मनाला स्वस्थ बसू देत नव्हती. तेवढ्यात बाबूचा फोन आला आणि त्याने तर साहेब आपला रवी आपल्याला सोडून गेला हे सांगताना फोडलेला हंबरडा ऐकून डोळ्यात दु:खाश्रू दाटले. विश्वासू आणि प्रामाणिक कर्मचारी ही कोणत्याही संस्थेची खरी संपत्ती असते याची जाणीव रवीच्या अकाली जाण्यामुळे नक्कीच झाली. पण काय करणार? ईश्वरी इच्छेपुढे इलाज नसतो हेच खरे!! रवीच्या या कधीही न परतण्याच्या जाण्याने त्याचे कुटुंब दुःख सागरात लोटले गेले आहे. त्यांना शब्दरूपी आधार देणेच आपल्या हातात आहे. त्यांच्या दुःखात आम्ही दापोली अर्बन परिवारातील सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्याचे आत्म्यास चिरशांती देवो!!