रत्नागिरी : शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले या कोरोना बाबतच्या आकडेवारी लपवून प्रशासनाबरोबरच जनतेची ही दिशाभूल करत असून खोटी आकडेवारी प्रसिद्ध करत असल्याचे आरोप भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले.
६ एप्रिल तारखेला कोरोनाचे चार जण मयत असताना शासकीय रुग्णालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात जे प्रसिद्धीमाध्यमांना दिले जाते. त्या मध्ये मयत फक्त दोनच दाखवले गेले. 7 तारखेच्या आकडेवारी चार जण मयत असे दोन दिवसाचे सहाजण दाखवले गेले. परंतु प्रत्यक्षात काल नगरपरिषदेने आठ कोरोना रुग्णांची मृतदेहांचे दहन केले. नवीन हे दोन मृतदेह कुठून शासकीय रुग्णालया ने पाठवले ते कोरोनाचेच मृतदेह होते का? याचीही माहिती मिळणे आवश्यक आहे.
शासकीय रुग्णालयात पुरेसे डॉक्टर नर्स नसतानाही शल्यचिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले सरकारला खोटी माहिती देत असल्याचा आरोपही अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे. याबाबत बोलताना अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले की मंत्री उदय सामंत यांना विनंती आहे की डॉक्टर संघमित्रा फुले यांच्याकडून खरी माहिती समजून घ्यावी त्यानंतर आम्ही त्यांना सविस्तर माहिती देतो.
या शासकीय रुग्णालयात तज्ञ डॉक्टर असलेले डॉक्टर जांभुळकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्यावरच त्यांनी शासकीय रुग्णालय सोडून गेले व भंडारा जिल्ह्यात स्वतःचे हॉस्पिटल काढले. चांगले डॉक्टर शासकीय रुग्णालय सोडून जात आहेत. अशा शासकीय रुग्णालयात एकही अद्यावत ॲम्बुलन्स नाही एक आहे ती डॉक्टर जोशी यांची एकमेव ॲम्बुलन्स आहे. त्याचे भाडे मुंबईला जाण्यासाठी 38 हजार रुपये आहे, तर बरोबर डॉक्टर घेऊन गेल्यास डॉक्टरांची फी पाच हजार रुपये आहे असे जर कोरोना ने आजारी असणाऱ्या रुग्णांना 50 हजार रुपये फक्त गाडी भाडे भरावे लागत असतील तर गरीब लोकांनी काय करावं?
जिल्हा नियोजन मधून 7 ॲम्बुलन्स खरेदी केले करण्याचा निर्णय झाला. त्याचे पुढे काय झाले याची माहिती प्रशासनाने लोकांना द्यावी. त्या गाड्या गेल्या कुठे उद्यमनगर येथील महिला रुग्णालयात आज 116 पेशंट दाखल आहेत. त्यांना दिवस रात्र फक्त 37 नर्स बघत आहेत. 116 पेशंट फक्त 37 नर्स दोन पाळ्यांमध्ये बघत आहेत मग अत्यवस्थ अशा पेशंटला लक्ष कोण देणार खरं तर त्या हॉस्पिटलला आता 65 ते 70 नर्स ची गरज आहे. तसेच महिला रुग्णालय कोविड रुग्ण केल्याने डॉक्टर मतीन परकार हे एकमेव फिजिशियन विजिट वर या शासकीय रुग्णालयात येत आहेत. ते पण त्यांचा हॉस्पिटल सांभाळून मग दिवसभर कोरोना पेशंटने काय करावे जे अत्यवस्थ होत असतील , 116 पैकी 16 पेशंट हे आत्ता तरी आयसीयूमध्ये अत्यवस्थ अवस्थेत आहेत, असंही अनिकेत पटवर्धन म्हणाले.
पुन्हा शासकीय रुग्णालय कोविड सेंटर म्हणून सुरु करावे. कारण जिल्हा रुग्णालयातील आय.सी.यु. हा विभाग अत्याधुनिक असून तेथे सिलेंडर वाहने सोपे जाते व नगरपरिषदेच्या मजगाव येथील दवाखाना इतर आजारांसाठी पूर्वीप्रमाणे सुरू करावे असेही अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयात आज खाजगी डॉक्टर सेवा करायला तयार नाहीत .कारण मागील वर्षाच्या कोरोना काळात केलेल्या कामाचे त्यांचे बिल शल्यचिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले काढत नाहीत. कोव्हिड निधी जिल्ह्याला उपलब्ध असताना त्यांची बिले दिली जात नसल्याने आता ते शासकीय रुग्णालय सेवा करायला तयार नसल्याचेही पटवर्धन यांनी सांगितले.