रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा एमसीए अंडर-16 निमंत्रित लीग स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्रा संघावर शानदार विजय

पुणे: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित अंडर-16 निमंत्रित लीग स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने क्लब ऑफ महाराष्ट्रावर 142 धावांनी दमदार विजय मिळवला.

हा सामना काल (1 मे 2025) आणि आज (2 मे 2025) पुण्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळवला गेला.

रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनच्या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारताना पहिल्या डावात सर्वबाद 108 धावा केल्या.

प्रत्युत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्राने 115 धावा करत 7 धावांची आघाडी घेतली.

मात्र, दुसऱ्या डावात रत्नागिरीने जोरदार पुनरागमन करत 211 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.

या लक्ष्याचा पाठलाग करताना क्लब ऑफ महाराष्ट्राचा डाव 62 धावांतच गडगडला आणि रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनच्या संघाने शानदार विजय संपादन केला. 

रत्नागिरीच्या या विजयात गुरुप्रसाद म्हस्के याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रांत चमक दाखवली.

त्याचबरोबर ओम बंदरकर, अथर्व चिले, रुद्र लांजेकर आणि स्वरित चाळके यांनी फलंदाजीतील आपल्या कौशल्याने सामन्यावर छाप पाडली.

गोलंदाजीत श्रवण शिर्के याने उत्कृष्ट कामगिरी करत क्लब ऑफ महाराष्ट्राच्या फलंदाजांना अडचणीत आणले.

याशिवाय, कुणाल गावडे आणि अफसान मिरकर यांनीही आपल्या खेळाने रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनच्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाचे या स्पर्धेतील उर्वरित चार सामने पुण्यात होणार असून, संघाकडून पुढील सामन्यांमध्येही अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

रत्नागिरीच्या या विजयाने त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, निमंत्रित लीग स्पर्धेतील त्यांच्या पुढील प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*