रत्नागिरी : जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष व प्रभारी हारीस शेकासन व शहराध्यक्ष रमेश शाहा यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घायरकर यांची भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी शहरातील वाहतूक समस्यांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्यांने जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन, शहराध्यक्ष रमेश शाहा व अल्पसंख्यक विभाग तालुकाध्यक्ष शाहरुख वागले यांनी काही अडचणी सुधीर घायरकर यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर सुधीर घायरकर यांनी सुचनांचे स्वागत करुन जनतेला पोलीस चांगली सेवा देतील,असे आश्वासन दिले.

यावेळी शहर उपाध्यक्ष रफिक मुल्लाजी व सरचिटणीस पत्रकार रहिम दलाल उपस्थित होते.