रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रपतींच्या भेटीसाठी पोलीस दलाने चांगलीच कंबर कसली आहे. गुरूवारी 10/02/20222 रोजी जिल्हा पोलीस दलाने आपल्या बंदोबस्ताची व इतर बाबींची रंगीत तालीम घेतली.

राष्ट्रपतींच्या या बंदोबस्तासाठी पोलीस दलानं जय्यत तयारी केलेली दिसून आली. राष्ट्रपतींच्या या बंदोबस्ताकरिता पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस अधीक्षक पर्यंत असे एकूण 118 अधिकारी असून तब्बल 800 पोलीस अमलदार व 200 होमगार्ड सुरक्षा साठी तैनात केले आहेत.

त्यामध्ये जलद प्रतिसाद पथके, दंगा काबू पथके, एसआरपीएफ तुकड्या तसेच बॉम्बशोधक पथके आणी इतर वेगवेगळ्या पथकांचा समावेश आहे.

एवढा मोठा बंदोबस्त असल्याने मंडणगड परिसराला सर्वत्र सध्या पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यातून सर्व प्रकारच्या आव्हान पेलण्यास पोलीस दल समर्थ असल्याचे जणू पोलीस दलाने संदेश दिला आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री मोहित कुमार गर्ग यांनी आवश्यक ती सर्व तयारी पोलीस प्रशासनाने केले असल्याचे सांगून हा व्हीव्हीआयपी दौरा उत्तम प्रकारे पार पाडू असा विश्वास त्यांनी मंडणगड येथे व्यक्त केला.

यावेळी नागरिकाना, प्रसारमाध्यमे प्रतिनिधींना हा दौरा शांततेत व सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी केले आहे.