रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी काढण्यात आली.

अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी ही सोडत काढण्यात आली, अशी माहिती रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी जाहीर सूचनेद्वारे दिली.

मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोडत काढण्याचा कार्यक्रम नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडला.

आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२५ पासून मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावयाच्या आहेत.

आवश्यक असल्यास हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीसाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असेही सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये एकूण १६ प्रभाग असून, ३२ नगरसेवक निवडून येणार आहेत. खालीलप्रमाणे प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे:

  • प्रभाग क्रमांक १ अ: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक १ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक २ अ: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक २ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ३ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • प्रभाग क्रमांक ३ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ४ अ: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक ४ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ५ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ५ ब: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक ६ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ६ ब: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक ७ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ७ ब: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक ८ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • प्रभाग क्रमांक ८ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ९ अ: अनुसूचित जाती सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ९ ब: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक १० अ: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक १० ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ११ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ११ ब: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक १२ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • प्रभाग क्रमांक १२ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक १३ अ: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक १३ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक १४ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • प्रभाग क्रमांक १४ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक १५ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • प्रभाग क्रमांक १५ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक १६ अ: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक १६ ब: सर्वसाधारण

या आरक्षण सोडतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागलं होतं. निवडणुकीसाठी पुढील प्रक्रिया लवकरच जाहीर करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.