जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हयातून दारु, जुगार, मटका, गुटखा, गांजा, चरस तसेच इतर अवैध धंदयांचे जिल्हयातून समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने व तक्रारदार नागरीकांच्या सोयीच्या दृष्टीने जिल्हा स्तरावर व्हाट्सअॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

या संपर्क क्रमांकावर अवैध धंदयांबाबत जिल्हयातील कोणतेही नागरीक व्हाट्सअॅपव्दारे तक्रार नोंदवू शकतात. पोलीसांकडून तक्रारदाराची संपुर्ण माहिती गोपनिय ठेवण्यात येईल. त्यामुळे अवैध धंदयाबाबत तक्रार देण्यासाठी नागरीकांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले असून त्याआधारे जिल्हयातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करण्यास पोलीसांना मोठी मदत होणार आहे. गोपनिय माहितीकरीता व्हाट्सअॅप क्रमांक 8263883319 देण्यात आला आहे.