रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४१७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४०३८ वर पोहोचली आहे. दुसरी लाट अतिशय वेगवान पद्धतीनं पसरत आहे.
रत्नागिरीत जिल्ह्यात कोरोनामुळे 6 जणांच्या मृत्यूची नोंद सुद्धा करण्यात आली आहे. दापोली तालुक्यात 2, रत्नागिरी-1, लांजा-1, संगमेश्वर-1 आणि चिपळूणला-१
आशा प्रकारे एकूण ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
परिस्थिती हळू हळू हाताबाहेर चालली आहे. कुणीही घर बाहेर पडू नये. अनावश्यक तर अजिबात फिरू नये, अशी स्थिती आहे. रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीयेत एवढी रूग्णांची संख्या वाढली आहे. आपली खबरदारी आपल्या हातात आहे.
आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया,
आरटीपीसीआर
रत्नागिरी-१२६
दापोली -२५
खेड- ००
गुहागर-१९
चिपळूण- ११
संगमेश्वर-१०९
मंडणगड-२२
लांजा- १६
राजापुर-१०
एकूण-३३८
अँटिजेन
रत्नागिरी-२३
दापोली-१२
खेड-१४
गुहागर-१०
चिपळूण-०८
संगमेश्वर-१२
मंडणगड-००
लांजा-००
राजापूर-००
एकूण-७९