राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दाेन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी १० हजार लसींचे डाेस मिळणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेच्या सद्यस्थिती संदर्भात संचालक अर्चना पाटील यांच्याशी विस्तृतपणे चर्चा केली. उद्या सकाळपर्यंत लस पोहाेचणार असल्याची माहिती दिली आहे. याकरिता दोन्ही जिल्ह्यातून लस आणण्यासाठी आजच गाड्या पुण्याला रवाना होणार आहेत. पुढेही लस कमी पडू नये, याकरिता मंत्री उदय सामंत यांनी संचालकांना विनंती केली. खासदार विनायक राऊत हे देखील दोन्ही जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेत असून लस उपलब्धतेसाठी प्रयत्न करत आहेत.