रत्नागिरी : आज असंख्य भारतीयांचं स्वप्न साकार होत असून रामभक्तांसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि जल्लोषाचा आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचं लोकार्पण आणि प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरु आहे.

हा अभूतपूर्व सोहळा महाराष्ट्रचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी समस्त जनतेसमवेत शहरातील जयेश मंगल पार्कमध्ये लाईव्ह पाहिला. भारतासह जगामध्ये हा सोहळा पाहिला जात आहे.

राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी अयोध्येतील हा अभूतपूर्व सोहळा जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवता यावा ह्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.

त्यासाठी जयेश मंगल कार्यालय येथे लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तो सोहळा त्यांनी जनते सोबत उपस्थित राहुन पाहिला.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्तिकीरण पुजार, ॲड. राजशेखर मलुष्टे, बाळू साळवी, किशोर मोरे, अलिमिया काझी, प्रशांत सुर्वे, दीपक पवार, अभिजित गोडबोले, महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे, स्मितल पावसकर, वैभवी खेडेकर, रत्नागिरी मुख्यधिकारी तुषार बाबर यांच्या सह अनेक रत्नागिरीकर उपस्थित होते.

Advertisement