
रत्नागिरी पावसाच्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले. काल दिवसभर सरींवर सरी काेसळत हाेत्या. रात्रभर पाऊस सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. रात्री मोठा गडगडाट सुरू झाला.
गुहागर– तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू हाेता. काल सकाळी पालशेत येथील बाजारपूल पाण्याखाली गेला. शहरातील अनेक घरांपर्यंत पाणी पोचले. काही वेळाने बाजारपूलावरील पाणी ओसरले.
खेड– तालुक्यात 2 दिवस पावसाचा जाेर वाढला. जगबुडी, नारंगी, चोरद या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खेड शहरातील सखल भागातही पाणी साचले. खाडीपट्टयातील १५ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले आहे.
राजापूर दोन दिवसांपासून तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कडवई, तुरळ, तांबेडी, माखजन परिसरात पावसाचा जोर कायम आहे.

Leave a Reply