आज महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे.