मुंबई : विधीमंडळामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता, लोकप्रतिनिधींकडून आलेल्या कामांची यादी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांच्या निविदा प्रक्रियांची सद्यस्थिती या विषयांबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी माहिती घेतली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची आतापर्यंत किती कामे पूर्ण झाली, किती कामे प्रगतीपथावर आहेत याचाही अधिकार्यांकडून आढावा घेतला.
त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सध्या सुरु असलेल्या कामांमध्ये दिरंगाई करु नका, कामांमध्ये काही अडचणी असतील तर विभागाच्या सचिवांशी चर्चा करा, अशा सूचना उपस्थित अधिकार्यांना दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकल्प राबविताना अनेक ठिकाणी भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रकल्पाला विलंब होतो. अशावेळी संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क करून हा प्रश्न कसा लवकरात लवकर सुटेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकल्प राबविताना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील यादृष्टीने त्या विभागाच्या मुख्य अभियंतांनी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन केले.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण, मुंबई, नाशिक, पुणे या सर्व प्रादेशिक विभागांचे तसेच नॅशनल हायवे ऑथोरिटीचे अधिकारी उपस्थित होते.