खेड : जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभागाच्यावतीने खेडच्या प्रियांका अभिषेक पागार- सावंत यांना दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी गुहागर येथे पार पडलेल्या वार्षिक पुरस्कार सोहोळ्यात मानचिन्ह व शिक्षणरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दरवर्षी पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभाग २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत आहे.
यावर्षीही हा दिवस मोठ्या उत्साहाने सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत तळवली गुहागर येथील लेटन अँग्रो टुरिझम येथे दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरा करण्यात आला.
यावर्षी पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभागकडून विविध कार्यक्रम व उपक्रम घेण्यात आले होते. यामधील एक कार्यक्रम म्हणजे सत्कार व विशेष पुरस्कार. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील आपले कामाचे नियोजन व योगदान तसेच लेखन यांचा विचार करून शिक्षणरान पुरस्कारासाठी खेडच्या प्रियांका अभिषेक पागार- सावंत यांची सर्वोत्तम निवड करण्यात येऊन त्यांना वार्षिक पुरस्कार सोहोळ्यात मानचिन्ह व शिक्षणरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.