खासगी कोविड रूग्णालयातील लूट रोखण्यासाठी ऑडिटर नेमणार

रत्नागिरी : खासगी कोविड सेंटरमध्ये रूग्णांकडून अवाजवी बीले आकारली जातात. कोविड उपचाराच्या प्रोटोकॉलचे पालन केले जात नसल्याबाबत अनेक तक्रारी आल्यामुळे यापुढे खासगी कोविड रूग्णालयातील बिलांचे ऑडिट होणार आहे. बिलांचे ऑडिट झाल्यानंतर ते योग्य असेल तरच रूग्णाने ते बिल भरायचे आहे. जर ऑडिट मध्ये चुकीच्या पध्दतीने बिल आकारले तर त्या खासगी कोविड सेंटरवर कारवाई होईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*