मंडणगड: भारताचे राष्ट्रपती महामहीम डॉ . रामनाथ कोविंद हे १२ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावाला भेट देत असून राष्ट्रपतींच्या या दौऱ्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील झाडून सगळे प्रशासकीय अधिकारी कामाला लागलेले दिसून आले आहेत.

मंडणगड तालुक्याला अक्षरशः लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. तर या संपूर्ण दौर्यावर पोलिसांसह गुप्तचर यंत्रणांची बारीक नजर आहे. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यानिमित्त प्रशासनाने मात्र जय्यत तयारी सुरु केली आहे.