मुंबई : – राज्य शासनाच्या भाषा विभागाने मागील दोन वर्षांत उल्लेखनीय काम करत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले. यापुढे मराठी भाषा विभागाला दिशा देणारा पुढील तीन वर्षांचा ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
मराठी भाषा विभागांतर्गत येत असलेल्या चार संस्थांच्या कामाचा आढावा व आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.