रत्नागिरीतील कर्मचारी योगेश मोडसिंग यांचाही होणार गौरव
नवी मुंबई – सन २०२० या वर्षात आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी बेस्ट अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोकण विभाग अंतर्गत माहिती व जनसंपर्क विभागाचे एकूण ५ कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या प्रसिध्दीचे काम निरंतरपणे सुरु असते. गेल्या वर्षभरात कोरोना काळातही आपल्या पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच इतर कामातही हिरीरीने सहभाग घेऊन उत्तम काम करणाऱ्या, तसेच कोरोनासारख्या आपत्कालिन परिस्थितीत तसेच निवडणुकीच्या कालावधीत उत्तम कार्य करणाऱ्या आणि अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीतही आलेल्या कामाची जबाबदारी स्वीकारुन माहिती तत्परतेने पोहचविणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
वर्ष 2020 साठीच्या उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी
गंगाधर जामनिक,दूरमूद्रण चालक-नि-टंकलेखक, जिल्हा माहिती कार्यालय, पालघर
योगेश मोडसिंग, दूरमूद्रण चालक-नि-टंकलेखक, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी
सचिन काळुखे, लिपिक टंकलेखक, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
राजेश्री वाडेकर, लेखा लिपिक, विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई
धनंजय कासार, सिनेयंत्र चालक, जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे
प्रेम शुक्ला, सिनेयंत्र चालक, जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे
शशिकांत केळकर, वाहनचालक, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी
अजित पड्याळ, रोनिओ ऑपरेटर, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी
शशिकांत भोसले, शिपाई, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड
सदर अधिकारी कर्मचारी यांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी दिली आहे.