गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेसह अन्य विरोधी पक्षांकडून मुंबईतील खड्ड्यांवरून महापालिकेवर (BMC) टीका केली जात आहे.
मुंबईतील खड्डे बुजवण्याचे अनेक दावे महापालिकेकडून केले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याने मुंबईकर वैतागलेला आहे, असे सांगितले जात आहे.
काही मिनिटांच्या प्रवासाला अनेक तासांचा कालावधी लागत आहे. यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या खड्ड्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहिले असून, दिवाळीपर्यंत खड्ड्यांबाबत ठोस पावले उचलली नाही, तर रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे.
एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी या पत्रात केली आहे.