संगमेश्वर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66चे रुंदीकरण करण्याचे काम एकीकडे सुरु असताना राष्टीय महामार्ग वरील पडलेले खड्डे बुजवा, खड्डे बुजावा असे वेळोवेळी सांगून ही संबधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
बावनदी ते आरवली पट्यातील आणि विशेष म्हणजे संगमेश्वर सकाळ नगर, तळेकांटे, बावनदी परिसरात पडलेले खड्डे येत्या चार दिवसात न भरल्यास सकाळ नगरच्या खड्यात बसून संबंधित विभागाचा निषेध करणार असल्याची माहिती नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी दिली आहे.
संबंधित विभागाशी वेळोवेळी पाठपुरावा करूनही हे जीवघेणे खड्डे भरण्यास सबंधित अधिकारी लक्ष देत नाहीयेत. त्यामुळे आंदोलन करत संबंधित मंत्री आणि विभागाचे डोळे उघडण्याचे काम करणार असल्याचं रमजान गोलंदाज यांनी सांगितलं.
या आंदोलंनाला ग्रामीण पत्रकार संघ संगमेश्वर आणि विविध संघटना ही सहभागी होणार असल्याचे त्यानी सांगितले जर यावेळीस कायदा आणि सुव्यवस्था बिघडलि किंवा महामार्ग वर कोणताही प्रकार घडल्यास त्याला राष्ट्रीय महामार्ग अधिकारी जबाबदार असतील असे ही रमजान गोलंदाज यांनी स्पष्ट केले आहे.
येत्या 4 दिवसाच्या जर खड्डे भरत नाहीत तर खड्डे भरे पर्यत त्या खड्ड्यातून उठणार नसल्याची भूमिका रमजान गोलंदाज यांनी घेतली आहे.