मुंबईत मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता

मुंबई – भारतात एका दिवसात एक लाख बाधित होण्याचा टप्पा शुक्रवारी ओलांडला. यापूर्वी सहा जून 2021ला एवढे बाधित सापडले होते. 10 हजारावरून एक लाखाचा टप्पा ओलांडण्यासाठी अवघे आठ दिवस लागले.

गुरुवारी बाधितांची संख्या एक लाख 17 हजार नोंदवण्यात आली. पहिल्या लाटेत 10 हजारा वरून एक लाखाचा टप्पा ओलांडण्यासाठी 103 दिवस लागले. तर दुसऱ्या लाटेत 47 दिवस लागले. त्यामुळे दुसऱ्या लाट शिखरावर असताना दिवसाला चार लाख संसर्गित होत होते त्यापेक्षा पाचपट वेगाने हा संसर्ग होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईत आढळलेल्या 20 हजार 181 रुग्णापैकी 85 टक्के जणांना लक्षणे नाहीत. केवळ एक हजार 170 जणांना रुग्णालयात हलवावे लागले. त्याच्यातील फक्त 106 जणांना ऑक्सिजन पुरवावा लागला. मुंबईत 33.06 इतका पॉझिटिव्हीटी दर आहे.

वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुंबई महानगर पालिका कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या मुंबईत लॉकडाऊन लावण्यात येण्याची शक्यता असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलतांना किशोरी पेडणेकर म्हणाल्या,’. महाराष्ट्रामध्ये योग्य निर्णय मुख्यमंत्री घेतील. पण मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी सार्वजनिक ठिकाणी आणि बाजारांमध्ये होणारी गर्दी पाहून लोकांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसत नाही. ही वेळ घरात बसण्याची निश्चित नाही पण घाबरण्याचीही नाही,’ असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*