कोरोना काळात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे

नवी दिल्ली : ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाना आपत्कालीन मंजुरी दिला आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूरल अॅंड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी एकत्र येत या औषधांची निर्मिती केली आहे.

या औषधाला सध्या 2-deoxy-D-glucose (2-DG) असं नाव देण्यात आलं आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबरोटरिजवर देण्यात आली आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होणे ही मोठी समस्या आहे.

यामुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी 2-DG हे औषध फायदेशीर ठरणार आहे. कारण क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना रुग्णांलयात ऑक्सिजनचा वापरही कमी करावा लागत आहे.

तसेच इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2-DG च्या वापराने रुग्ण कमी वेळेत कोरोनावर मात करत आहेत म्हणजे कोरोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत.
डीआरडीओच्या वैज्ञनिकांनी एप्रिल 2020 मध्ये या औषधावर काम सुरु केलं होतं.

यावेळी कोरोनावर हे औषध अत्यंत प्रभावशाली असल्याचं वैज्ञानिकांच्या लक्षात आलं. या आधारे DCGI ने मे 2020 मध्ये या औषधाच्या फेज 2 ट्रायलला मंजुरी दिला होती. 2DG औषधाच्या ट्रायलचा पहिला टप्पा सहा रुग्णालयांमध्ये घेण्यात आला आणि देशभरातील 11 रुग्णालयात फेज (डोस रेंज) क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. दुसर्‍या टप्प्यात 110 रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*