निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीने राजकीय उलथापालथ

मुंबई : निवडणूक रणनीतीकार म्हणून संन्यास घेतलेले प्रशांत किशोर यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भेटीचे कारण गुलदस्त्यात असले तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, काल शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आगामी काळात महाविकासआघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवेल, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. मात्र प.बंगालच्या निवडणूक निकालानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले होते की, “मी जे आता करत आहे ते यापुढे करण्याची इच्छा नाही. मी खूप काम केलं. आता ब्रेक घेऊन आयुष्यात वेगळं काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मला निवडणूक रणनीतीकार संन्यास घ्यायचा आहे,” शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी भेट नेमकी कशासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*