भारतीय जनता पक्षानं निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये जाऊन आईची भेट घेतली. दोन वर्षांनंतर मोदी आई हिराबेन यांच्या भेटीसाठी पोहोचले.
याआधी ऑक्टोबर २०१९ मध्ये मोदींनी आईंची भेट घेतली होती. काल पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आज मोदी गुजरातमध्ये पोहोचले.
गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. मोदी आईसोबत जेवले. याआधीही मोदींनी जेव्हा जेव्हा आईची भेट घेतली, तेव्हा तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल झाले. मोदींनी आज आईची भेट घेऊन तिचे आशीर्वाद घेतले.