रत्नागिरी जिल्हा मर्यादित १४ वर्षांखालील मुलांसाठी
रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे निवड चाचणी शिबीर दोन टप्प्यांमधे आयोजित करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात २०/१०/२०२१ रोजी खेड क्रिकेट ॲकॅडमी गोळीबार मैदान, खेड येथे खेड, चिपळुण, दापोली, मंडणगड, गुहागर या तालुक्यांतील मुलांसाठी निवड चाचणी घेण्यात येईल. संबंधित वयोगटातील मुले ज्यांचा जन्म ०१/०९/२००७ नंतर झाला आहे अशांनी आपापल्या किट व युनिफॅार्मसह सकाळी ठीक ८.०० वा. उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी खेड क्रिकेट ॲकॅडमीचे कैलास सावंत +91 72762 09998 यांच्याशी संपर्क करावा.
दुसऱ्या टप्प्यात दि.२२/१०/२०२१ रोजी छ. शिवाजी स्टेडियम रत्नागिरी येथे रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर व राजापूर या तालुक्यांतील मुलांसाठी निवड चाचणी घेण्यात येईल.
संबंधित वयोगटातील मुलांनी किट, युनिफॅार्म सह सकाळी ठीक ८.०० वा. मैदानावर उपस्थित रहावे, दोन्ही ठिकाणी येताना रजिस्ट्रेशन फी रु. १००/- , वयाचा दाखला व रहिवासाचा दाखला घेउन येणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी सचीव सुरेश जैन नं. ७०२०८५८१५३ यांच्याशी संपर्क करु शकता.
तरी इच्छुक क्रिकेटपटुंनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आव्हान असोसिएशनचे कार्याध्यक्ष बिपीन बंदरकर यांनी केले आहे.