दापोली :- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेट यांच्यामध्ये दापोली आणि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध संशोधन केंद्रावर पेट्रोलपंप उभारणे संदर्भात सामंजस्य करार नुकताच विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे आणि सिनिअर रिजनल मॅनेजर कोकण विभाग प्रिन्स जिंदाल यांनी सामंजस्य करारावर सहया केल्या.

यावेळी हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेट यांच्यावतीने रोहित कटियार सहाय्यक विक्री व्यवस्थापक, रत्नागिरी आणि आंतर श्रीमुखे तसेच विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक, डॉ. ई. शिनगारे, उपसंचालक संशोधन डॉ. संजय तोरणे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, विद्यापीठ अभियंता निनाद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

लवकरच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रागयड, ठाणे जिल्हयातील दहा ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्यात येणार असून त्यातून शुध्द स्वरुपात पेट्रोल व डिझेल लोकांना मिळेल अशी आशा कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी व्यक्त केली.

तसेच त्यामधून मिळालेल्या नफ्यातून विद्यापीठाच्या महसुलामध्ये वाढ होईल असे सांगितले.