नवी दिल्ली: उत्तर प्रदेशसह पाच राज्यात सुरु असलेल्या निवडणूकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. पण निवडणूकीच्या निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील चार महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. पण पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ICICI Securities ने जारी केलेल्या एका रिपोर्ट्सनुसार पुढील ११ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रतिलीटर १२ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. १० मार्च रोजी पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.