पावनखींड ने बाॅक्स ऑफिसवर केला कब्जा

मुंबई – मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हा सगळा इतिहास केवळ पुस्तकरूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. आणि यासाठीच इतिहासातील आणखी एक सुवर्ण पान उलगडण्याची वेळ आली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या लढवय्या आणि पराक्रमी मावळ्यावर आधारित ‘पावनखिंड’ गाजवणाऱ्या बाजीप्रभूंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर सध्या पाहायला मिळत आहे.18 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या पावनखिंड या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवला आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.15 कोटींची कमाई केली असून, ओपनिंग आठवड्याची एकूण कमाई 6 कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत एक नवा इतिहास रचला आहे हे नक्कीच. अजूनही या कमाईचा आकडा वाढत चालला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*