रत्नागिरी : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने एक पद्धत ठरवून दिलेली आहे. या पद्धतीनुसारच खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणे आवश्यक आहे. शिवाय कोरोना उपचारांचे दरपत्रक देखील शासनाने निश्चित केले आहे. कोरोना उपचारांसाठी खासगी रुग्णालय जास्त पैसे आकारात असेल तर त्याची तक्रार रुग्णांनी जिल्हा प्रशासनाकडे करावी. शासनाने ठरवून दिलेल्या उपचारपद्धती बाहेर जाऊन जादा पैसे आकारून जर उपचार केले जात असतील तर अशी बिले निदर्शनास आणून दिल्यास त्याचे ऑडीट करून जादा आकारण्यात आलेले पैसे परत केले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.