रत्नागिरी : ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मोहन मुळे यांनी ओबोसी समाज बांधणी करण्यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आपला झंझावाती दौरा सुरु केला आहे. राष्ट्रवादी ओबीसी प्रदेश सरचिटणीस आणि कोकण समन्वयक राजा राजपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांच्या शिफारसीने रत्नागिरी राष्ट्रवादी तालुका ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदी पप्पु तोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मोहन मुळे, प्रदेश ओबीसीचे कोकण समन्वयक राजा राजापुरकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव बंटी सदानंद वणजू, शहर विद्यार्थी अध्यक्ष साईजीत शिवलकर, मुलुंडचे योगेश मांजरेकर, नवी मुंबईचे असिफ खलीफे, विक्रोळीचे सचिन बोडके, रत्नागिरी सांस्कृतीक तालुकाध्यक्ष संदीप पावसकर, तालुका उपाध्यक्ष जयप्रकाश भालेकर, तालुका उपाध्यक्ष यशवंत डोर्लेकर, संदीप नार्वेकर, राजु केळकर, मिलिंद माळवदे, अक्षय मजगावंकर, निलेश तोडणकर, अभि वांदरकर आदी उपस्थित होते