खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सतिश ऊर्फ पप्पू चिकणे यांनी आज शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री विद्यमान आमदार रामदास कदम तसेच दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या उपस्तिथीत खेड येथे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पप्पू चिकणे यांच्यासह त्यांचे वडील चिकणे गुरूजी यांचा खेड शहरासह खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटन वाढविण्यासाठीचे मोठे योगदान आहे .त्यांचे वडील कै. चिकणे गूरूजी हे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहीले होते. तर पप्पु चिकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्षासह नगरसेवक पद भुषविले आहे. शहरासह तालुक्यात दांडगा लोक संपर्क असलेल्या पप्पू चिकणे यांनी शिवसेनेत केलेल्या पक्ष प्रवेशाने खेड तालुक्यातील शिवसेना पक्ष संघटन मजबूत होणार आहे तर शिवसेना विरोधी पक्षांना उतरती कळा लागली असल्याचे हे संकेत आहेत.