भाजपतर्फे कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

चिपळूण : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित्ताने भाजपा विधान परिषद सदस्य प्रसाद लाड व निता प्रसाद लाड यांच्या अंत्योदय प्रतिष्ठान मुंबईतर्फे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनय नातू यांच्यावतीने ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ भारतीय जनता पार्टी ग्रामीण व शहर पदाधिकारी यांना सुपूर्द करण्यात आले.

महामारीच्या काळात नागरिकांसाठी ही अत्यंत गरजेची मशीन सेवा देण्यासाठीच भारतीय जनता पार्टीने त्या उपलब्ध केल्या आहेत. लवकरच सर्वसामान्य नागरिकांसाठी भाजपा कार्यालय चिपळूण येथे उपलब्ध होतील. या वेळी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, शहराध्यक्ष आशिष खातू, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, जिल्हा संयोजक संदेश ओक, माजी सैनिक जिल्हा संयोजक दीपक चव्हाण, जिल्हा चिटणीस संतोष वरेकर, जिल्हा चिटणीस व नगरसेवक परिमल भोसले, दीपा देवळेकर, महेश दीक्षित, तालुका उपाध्यक्ष संदीप सुखदरे, प्रणय वाडकर, अमित पाटणकर, बाबू भोबस्कर आदी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*