▪️ देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण गंभीर आजारी पडत नाहीत, असे चित्र आहे.
▪️ चार महानगरांतील रुग्णालयांत दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ऑक्सिजन बेड ९१ तर, आयसीयू बेड ९८ टक्के रिकामे आहेत.
▪️ दिल्लीचे उदाहरण पाहता सध्या येथे रोज २० हजार रुग्ण आढळत आहेत. दुसऱ्या लाटेदरम्यान गेल्या वर्षी मेमध्ये एवढेच रुग्ण आढळत होते, तेव्हा १८,४७३ ऑक्सिजन बेड, ५३७१ आयसीयू बेड व १८५२ व्हेंटिलेटर बेड भरलेले होते.
▪️ या लाटेत एवढेच रुग्ण आढळत असतानाही आश्चर्य म्हणजे फक्त १४९१ ऑक्सिजन बेड, २७५ आयसीयू बेड व ९१ व्हेंटिलेटर बेड भरलेले आहेत.
▪️ म्हणजे दिल्लीत अजून ९१ टक्के ऑक्सिजन बेड, ९४ टक्के आयसीयू बेड व ९५ टक्के व्हेंटिलेटर बेड रिकामे आहेत.
▪️ तज्ज्ञांनुसार, ओमायक्रॉनमुळे फुप्फुसांना कमी इजा होते. म्हणूनच ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडत नाही.
▪️दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी स्पष्ट केले की, राजधानीत लॉकडाऊनची गरज नाही.
▪️ देशात रविवारी कोरोनाचे १,७९,४४३ नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारच्या तुलनेत ते २० हजारांनी अधिक आहेत.
▪️ दरम्यान, सर्वाेच्च न्यायालयातील ४ न्यायमूर्ती व १५० कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाली आहे.