राज्यात सुमारे १३ हजार पॅथोलॉजी लॅबपैकी ८ हजार पॅथोलॉजी लॅब बोगस

राज्यात सुमारे १३ हजार पॅथोलॉजी लॅबपैकी ८ हजार पॅथोलॉजी लॅब बोगस असल्याची माहिती शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी दिली. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासाठी नविन कायदा आणणार असल्याचे सांगितले आहे.

राज्यात सुमारे १३ हजार पॅथोलॉजी लॅबपैकी ८ हजार पॅथोलॉजी लॅब बोगस असल्याची माहिती मनिषा कायंदे यांनी सांगितली. राज्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅबच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी व सनियंत्रण ठेवण्यासाठी बाँम्बे नर्सींग होम अधिनियमात सुधारणा करुन नवीन कायदा आणणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. हा कायदा आणण्यासाठी 18 तज्ज्ञ सदस्यांची समिती नेमण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*