रत्नागिरी दि. 19 (जिमाका ):- महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 20 मे 2021 रोजी महाड जि. रायगड येथून सकाळी 9.00 वाजता मोटारीने मौजे बोरज ता. खेड जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 11.30 वाजता मौजे बोरज ता. खेड जि. रत्नागिरी येथे आगमन. व तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 1.30 वाजता संगमेश्वर येथील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरला भेट. दुपारी 2.15 वाजता निवळी ता. रत्नागिरी येथे तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 2.45 वाजता जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेसमवेत भेट व ऑक्सीजन बँक लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी). दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.30 वाजता मच्छीमार व आंबा बागायतदार यांचेसमवेत भेट (स्थळ: स्वामी स्वरुपानंद पतसंस्था, रत्नागिरी). परकार हॉस्पीटल रत्नागिरी भेट. सायंकाळी 5.15 वाजता मोटारीने ओरस, जि. सिंधुदूर्गकडे प्रयाण.