
खेड : खेड शहरातील एका तरुणीला अज्ञात व्यक्तीने अधिक परताव्याचे आमिष दाखवून ३ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने तरुणीला फोन करून घरी बसून पैसे कमवण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला १५ हजार रुपये खात्यात जमा करण्यास सांगितले.
त्याबदल्यात तरुणीच्या खात्यात जास्त परतावा जमा झाला. यानंतर, तरुणीला विश्वास बसला.
दुसऱ्या टप्प्यात, अज्ञात व्यक्तीने तरुणीच्या खात्यातून २ लाख १५ हजार रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग केले. यावरही संशयिताने जास्त परतावा दिला.
तिसऱ्या टप्प्यात, तरुणीने आणखी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर, परतावा येणे बंद झाले. तरुणीने अज्ञात व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave a Reply