दापोलीमधील होम क्वारंटाईन/हॉस्पिटल मधील गरजूंसाठी एक वेळेचा मोफत घरपोच डबा

दापोली- कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठान, दापोली आणि अभाविप दापोली तर्फे हा उपक्रम दि.28 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोना च्या भीषण संकटामध्ये अनेक कुटुंबातील सदस्य ऍडमिट आहेत, होम क्वारंटाईन आहेत. यामध्ये वृद्ध महिला/जोडपे, हातावर पोट असणारे मजूर, घरी जेवण बनवू न शकणारे असे गरजू लोक यांना विशेषतः या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. या संबंधित सर्व वितरण व्यवस्था अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी कार्यकर्ते करणार आहेत. यासाठी एक दिवस आधी फोन करून, आपली नोंदणी करावी लागणार आहे. आजपासून नोंदणी आणि उद्यापासून प्रत्यक्ष सेवा कार्य सुरू होणार आहे. नोंदणीसाठी संपर्क- 9067958879
कै.कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठान नेहमीच नैसर्गिक आपत्ती, समाजावरील संकटांच्या वेळेस एक पाऊल पुढे येऊन शक्य ती मदत प्रतिष्ठान करत असते. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये किराणा किट्सचे वाटप गरजूंना केले गेले. निसर्ग चक्रीवादळाच्या नंतर तालुक्यात विविध ठिकाणी ६०००+ झाडांचे , पत्रे,कौले यांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट अधिक पसरणारी आणि तीव्र असल्याने, या महाकाय संकटात ‘सेवा है यज्ञकुंड, समिधा सम हम जले’ या उक्तीला अनुसरून प्रतिष्ठान आपल्या परीने सेवा कार्य उभे करून खारीचा वाटा उचलत असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर दीपक महाजन यांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*