मोफत शिवभोजन थाळीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ

मुंबई:- ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू जनतेसाठी मदतीचं जे पॅकेज घोषित केलं होतं, त्यामध्ये राज्यातील गरीब जनतेला शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. १५ एप्रिल २०२१पासून सुरु असलेली ही सुविधा आता १४ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन पाठवलेल्या नि:शुल्क थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*