चिपळूण २१ जून:- चिपळूण पंचायत समितीतर्फे आज सोमवारपासून (दि.२१) तालुक्यात ‘एक कुटुंब, एक झाड’ लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी कृषी संजीवनी मोहीम राबवली जाणार आहे. २१ जून ते १ जुलै या कालावधीत चिपळूण पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागात ‘एक कुटुंब, एक झाड’ लागवडीचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आदेश देण्यात आले आहेत. सभापती रिया कांबळे, उपसभापती प्रताप शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.