रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. खबरदारी म्हणून उद्या दिनांक 6 जानेवारी 2022 पासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे.

विद्यार्थ्यांचं करोनापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं हा महत्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी घेतला आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील

ऑनलाइन क्लासेस मात्र सुरू राहणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांनी कळवले आहे. पुढील आदेशापर्यंत या शाळा बंद राहणार असून विद्यार्थी फक्त लस घेण्यासाठी शाळेत येऊ शकतात.