ओमीक्रॉन करतो मेंदूवर हल्ला, स्मरणशक्तीवर होऊ शकतो परिणाम

नवी दिल्ली: कोरोनाच्या (Corona) ओमीक्रॉन (Omicron) व्हेरियंट या नवीन प्रकाराने जगभरात खळबळ माजवली आहे. ओमीक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा (Delta) व्हेरियंटपेक्षाही धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. ओमीक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांमध्ये विविध लक्षणे (Symtoms) दिसतात, त्याचा परिणाम अनेक लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसत आहे. संशोधक सध्या ओमीक्रॉन संसर्गाच्या परिणामांवर संशोधन करत आहेत, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की ओमायक्रॉनचे एक लक्षण अनेक महिने टिकू शकते आणि त्रासदायकही ठरू शकते.

संशोधकाचे म्हणणे आहे की, हे लक्षण दूर होण्यास सुमारे एक वर्षाचा काळ लागू शकते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. ऑक्सफर्ड विद्यापीठातील (Oxford University) संशोधकांनी हे लक्षण ब्रेन फॉग (Brain Fog) म्हणून ओळखले आहे. याचा तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा तुमच्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो. कोरोनाच्या ओमीक्रॉन प्रकारातून बरे झाल्यानंतर दिर्घकाळ कोविडची लक्षणे जाणवत असल्याचे या संशोधनात समोर आलं आहे, ज्यामध्ये इतरांमध्ये ब्रेन फॉगचा समावेश आहे. ओमीक्रॉनच्या संसर्गामुळे स्मरणशक्ती कमी होते आणि संज्ञानात्मक समस्या उद्भवतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*