दापोली : दापोली सायकलिंग क्लब तर्फे १४ नोव्हेंबरला बालदिननिमित्त मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा जनजागृतीसाठी सायकल फेरी काढण्यात आली.

सायकल फेरी प्रभुआळी मार्गे आली असता श्रीराम देवस्थान अध्यक्ष राकेश कोटीया, तसेच नंदकुमार सणस, मंगला (बाई )सणस, शेखर प्रधान, प्रकाश शिंदे यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व या उपक्रमाबद्दल आयोजकांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

सायकल फेरी मधील सर्व सहभागी सदस्यांना लिंबू सरबत व शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी दापोली सायकल क्लबचे अंबरीश गुरव, पराग केळसकर व पदाधिकारी तसेच प्रभुआळी ग्रामस्थ उपस्थित होते…