संगमेश्वर व्यापाऱ्यांचा मदतीला ना. उदय सामंत धावले, सामंतांच्या आदेशनंतर उद्यापासून संगमेश्वर बाजारपेठ उघडण्याचा मार्ग मोकळा.

उद्या पासून नावडी, माभळे, कसबा मधील कंटेनमेंट झोन रद्द होणार

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील काही गावामध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या मुळे चार गावे कंटेन्मेंट झोन करण्यात आली आहे त्यामुळे संगमेश्वर बाजारपेठ मधील दुकाने बंद करण्यात आली होती याबाबत दुकाने बंद विरोधात संगमेश्वरातील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत . त्याच पार्श्वभूमीवर ना. उदय सामंत यांची संगमेश्वर बाजारपेठेच्या व्यापाऱ्यांनी आज भेट घेऊन त्यांच्या समोर समस्या मांडल्या. यावर ना. उदय सामंत यांनी तत्काळ व्यापाऱ्यांच्या समस्यावर निर्णय घेण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना दिले असून उद्या पासून संगमेश्वर तालुक्यातील तिन्ही गावा मधील कंटेनमेंट झोन रद्द करण्यात येणार आहेत.
ना. उदय सामंत यांनाचा आज संगमेश्वर – चिपळूण दौरा होता त्यावेळी त्यांनी व्यापारी वर्गाला वेळ दिला आणि व्यापरांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाने व्यापारांना सहकार्य करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना फोन वरून संपर्क करून संगमेश्वर भागातील 80% टेस्टिंग पूर्ण झाले असून उर्वरित टेस्टिंग दोन दिवसात पूर्ण होतील त्यामुळे येथिल व्यापारीवर्ग कोरोना काळात अजून भरडू नये म्हणून तात्काळ येथिल गावामधील कंटमेंट झोन रद्द करून दुकानें चालू करण्याचे लेखी पत्र काढण्याचे आदेश दिले. यावेळी प्रांतधिकारी डॉ. सूर्यवंशी हे ही उपस्थिती होते त्यामुळे दोन दिवसात लेखी पत्र काढले जाणार आहेत.
संगमेश्वर बाजारपेठ ही मोठी बाजार पेठ असून कोरोनाच्या काळात येथिल व्यापारी गेली एक वर्ष भर भरडली गेली आहे. त्यात इतर तालुक्यातील बाजार पेठा सुरु होत्या मात्र संगमेश्वर बाजार पेठ बंद होती. व्यापारी कर्ज काढून आपले व्यापार करत आहेत. काही व्यापारी भाड्याच्या गाळ्यात राहून भाडे भरावे लागत आहे. अनेकांचे बँकेचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग हा मेठाकुठीस आला असून त्यांचा आजची मोठी समस्या ना. उदय सामंत यांनी मार्गी लावल्याने व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी ना. उदय सामंत यांच्या समवेत पंचायत समिती सभापती जया माने, जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी बांधकाम सभापती बांबू म्हाप, नावडी सरपंच विवेक शेरे,जमूरत अलजी, रमजान गोलंदाज, तैमूर अलजी, मंदार खातू, संजय कदम, संदीप रहाटे रिंकू कोळवणकर, आदी व्यापारी वर्ग उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*