लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही-अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक

राज्यातील सरकार चालवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र असून २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल असं वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात तिन्ही पक्ष निवडणुकीत एकत्र काम करतील असं वक्तव्य केलं होतं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*