महाराष्ट्राला सुपरस्प्रेडर ठरवणाऱ्यांवर शिवसेना खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. पंतप्रदान नरेंद्र मोदी राज्यसभेत महाराष्ट्रातून स्थलांतर करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा स्प्रेड झाला असे म्हणाले. यावरुन महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये मृतदेह फेकले नाहीत आणि महाराष्ट्र सुपर स्प्रेडर असल्याचे म्हटलं जात आहे. किती खोट बोलतात असे संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात सर्वोत्तम काम केले असून दिल्लीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधीच झुकणार नाही असा इशाराच राऊतांनी दिला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, मला जे बोलायचे होते ते मी बोललो आहे. यापुढे आता जे काही बोलायचे असेल तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात जाऊन बोलेन. किती प्रयत्न करा, दबावतंत्राचा वापर करा, खोटे पुरावे उभे करा, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या, पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येड्या गबाळ्यांपुढे झुकणारा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आणि आता शरद पवार, उद्धव ठाकरे, इतर नेते हा महाराष्ट्राचा बाणा आहे. कोणाला महाराष्ट्राची लाज काढायची असेल तर त्यांनी काढावी असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये मृतदेह फेकले नाही
महाराष्ट्र हा कोरोनाचा सुपरस्प्रेडर असल्याचे म्हटलं आहे. महाराष्ट्राने कोरोना काळात सर्वोत्तम काम केले. महाराष्ट्रामध्ये जागोजागी, महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये मृतदेह नाही फेकले आणि महाराष्ट्र सुपर स्प्रेडर किती खोटं बोलतात. एका तरी भाजपच्या नेत्याने यावर आपल मत व्यक्त करायला हवं होते. हेच तुमचे महाराष्ट्र प्रेम, महाराष्ट्र बाणा, दिल्लीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचे युगपुरूष म्हटलं जाते. या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. राजकारणासाठी घेतात ते सोडून द्या परंतु बाणा आमच्याकडेच असल्याचे राऊतांनी ठणकावून सांगितले आहे.
शिवसेनाच मुंबईचा दादा
मुंबईचा दादा हा शिवसेना आहे. यावरुन टीका करण्यात येत आहे. परंतु यावर टीका करायचे कारण काय? बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि शिवसेना निर्मितीनंतर शिवसेना मुंबईत राहिली नाहीतर कधीच बाहेर गेली असती. अजूनही मुंबई ओरबडण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा पलटवार राऊतांनी टीका करणाऱ्यांवर केला आहे.